breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेहरुंकडे असलेले ज्ञान हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती : कवी साहिर लुधियानवी

मुंबई | अलाहाबादमध्ये 14 नोव्हेंबर 1889 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांचा जन्म झाला. तर 27 मे 1964 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यानंतरही जग नेहरुंना विसरू शकले नाही. कारण, नेहरू एक व्यक्ती नाही, तर एक विचारधारा आहे. आधुनिक भारताचे निर्माते नेहरुंची विचारधारा आजही जीवंत आहे.

म्हणूनच प्रसिद्ध कवी साहिर लुधियानवी यांनी नेहरुंना आदरांजली वाहताना म्हटले आहे. नेहरुंकडे असलेले ज्ञान हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. त्यांनी ‘द डिस्कवरी ऑफ इंडिया’, ‘ग्लिमप्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ आणि बायोग्राफी ‘टुवर्ड फ्रीडम’ अशी पुस्तके लिहली. ते विद्वानांसाठी महापंडित, तत्वज्ञांसाठी महान तत्वज्ञ, शास्त्रज्ञानांसाठी कुशल शास्त्रज्ञ आणि साहित्य आणि राजकारणातील कुशल पंडित होते. नेहरू एक व्यक्ति नाही तर विचारांचा मेळा होता. 20 व्या शतकातील महान नेते विस्टन चर्चिल, फ्रान्सचे राष्ट्रपती चार्ल्स डी गॉल, रशियाचे जोसेफ स्टालिन, लोकप्रीय राष्ट्रपती जॉन एफ केनेडी, चीनचे हुकूमशहा माओत्से तुंग यांच्या तुलनेत बौद्धिक पातळीवर नेहरू नेहमीच श्रेष्ठ आहेत. त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि मानवतावादी प्रतिमा यांच्यापेक्षा मोठी आहे. नेहरू जरी देशाचे पंतप्रधान होते, तरीही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच होते. 1951 साली राष्ट्रसंघाच्या परिषदेत त्यांनी दिलेल्या एका भाषणावरुन त्याचा प्रत्यय येतो.

“मी केवळ पंतप्रधान नाही, तर त्यापेक्षा अधिक आहे, मी माणूस आहे, कायम स्वतःत सुधारणा करण्यासाठी स्वतःशीच संघर्ष करत असतो, माणसांन कसं असायला हवं, याचाच विचार मी नेहमी करतो, यातून नेहरुंमधला माणुस आपल्याला पाहायला मिळतो”.

नेहरुंच्या कार्यकाळात सुरु झालेल्या IIT, IIM, NID, अणूऊर्जा प्रकल्प, ISRO यामुळे जगभरात भारताची ओळख आहे. मात्र, राजकारणात त्यांच्यावर अनेकवेळा टीका झाली. आजही नेहरुंना टार्गेट केलं जातं. मात्र, त्यांनी हयात असताना सर्वांचे विचार ऐकून घेतले. या त्यांच्या व्यक्तीमत्वावर सरोजनी नायडू यांनी पत्रातून लिहिले होते की, ”तुम भाग्य पुरुष हो, जो भीड़ के बीच भी अकेला रहने के लिए जन्म लेता है. जिसे लोग बेहद प्यार करते हैं, लेकिन समझते कम लोग हैं.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button