breaking-newsक्रिडा

सात्त्विक -चिराग अंतिम फेरीत पराभूत

फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : – सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या आघाडीच्या जोडीचा फ्रेंच युल्या बॅडिमटन स्पध्रेतील अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. इंडोनेशियाच्या अग्रमानांकित मार्कस गिडेऑन आणि केव्हिन सुकामुल्जो या जोडीने भारताला दोन गेम मध्ये २१-१८,२१-१६ ने पराभूत केले.

पॅरिस येथे सुरु असलेल्या स्पर्धेत एकुण ३५ मिनिटे चालेल्या खेळात अग्रमानांकित इंडोनेशियाचे मार्कस गिडेऑन आणि केव्हिन सुकामुल्जो सुरुवातीपासूनच आक्रमक खेळले. पहिल्या गेममध्ये मार्कस- केव्हिन या जोडीने दमदार स्मॅशेस लगावत सात्त्विक -चिराग या जोडीला निरुत्तर केले व २१-१८ अशी आगेकूच केली. त्यामुळे पहिल्या गेम मध्ये भारताच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर मात्र दुसर्या गेममध्ये भारत बरोबरी साधेल अशी अपेक्षा असताना मार्कस- केव्हिन या जोडीने आपले आक्रमक खेळी कायम ठेवत सात्त्विक -चिरागला २१-१६ ने नमवले आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात याच जोडीने  जपानच्या हिरोयुकी इन्डो आणि युटा वाटानाबे या जोडीचा सरळ दोन गेममध्ये धुव्वा उडवत फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. ऑगस्ट महिन्यात सात्त्विक-चिराग जोडीने थायलंड खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने पहिलेवहिले सुपर ५०० जेतेपद पटकावले होते. आता सुपर ७५० दर्जाच्या या स्पर्धेत सात्त्विक-चिराग यांनी जपानच्या जोडीचा २१-११, २५-२३ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड टूर ७५० स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ही पुरुष दुहेरीतील भारताची पहिली जोडी ठरली आहे. सात्त्विक-चिराग यांना जपानच्या या जोडीकडून २०१८मध्ये इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत, तर २०१७मध्ये जागतिक स्पर्धेत पराभव पत्करावा लागला होता. पण या दोन्ही पराभवांची परतफेड भारताच्या जोडीने शनिवारी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button