breaking-newsराष्ट्रिय

नीरव मोदीला दणका; PNBला व्याजासहित ७३०० कोटी रुपये देण्याचे डीआरटीचे आदेश

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) चुना लावून देशातून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्यातील कर्ज वसुली कोर्टाने (डीआरटी) मोठा दणका दिला आहे. व्याजासहित ७३०० कोटी रुपये नीरव मोदीने पीएनबीला चुकते करावेत असा आदेश डीआरटीने दिला आहे.

View image on Twitter

View image on Twitter

ANI

@ANI

Debt Recovery Tribunal (DRT), Pune today passed an order asking Nirav Modi and his aides to repay amount to the tune of Rs 7300 crore with interest to Punjab National Bank (PNB).

यापूर्वी सिंगापूरच्या हायकोर्टाने नीरव मोदीला झटका देताना ब्रिटनमध्ये नोंदणीकृत असलेली कंपनीचे बँक खाते गोठवण्याचे आदेश दिले होते. या खात्यात त्याचे ४४.४१ कोटी रुपये आहेत. या खात्याचे लाभार्थी नीरव मोदीची बहिण पूर्वी मोदी आणि मेव्हणा मयांक मेहता हे आहेत. ईडीने मांडलेल्या मुद्द्यानुसार निर्णय देताना कोर्टाने सांगितले होते की, या खात्यातील पैसा हा गुन्ह्यातील पैसा आहे. यामध्ये पीएनबी घोटाळ्यातील रक्कम अवैध पद्धतीने पाठवण्यात आला आहे.

त्याचबरोबर स्वित्झर्लंडच्या प्रशासनानेही २७ जूनला नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीच्या चार स्विस बँकेच्या खात्यांमधून होणारे व्यवहार रोखले होते. भारतात नीरव मोदी विरोधात सुरु असलेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणातून ही कारवाई करण्यात आली होती. सध्या या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपये जमा आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button