breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज ठाकरेंवरील व्यंगचित्रात रेखाटला ‘नमो रूग्ण’!

मुंबई  –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मकरसंक्रांती निमित्त व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निषाणा साधला होता. मोदी ‘नव्या थापां’चे पतंग उडवत असल्याचे दाखवलेल्या राज यांच्या व्यंगचित्राला भाजपाने प्रत्युत्तर दिले. मात्र भाजपाने केलेला पलटवार त्यांच्याच अंगलटी आला आहे.

‘राज एक कटी पतंग’ असे भाजपाने व्यंगचित्रात रेखाटले असून त्यांच्या मागे एक ‘नमो रूग्ण’ दाखवला आहे. ‘भाजपा महाराष्ट्र’ने हे व्यंगचित्र टिवट केल्यानंतर मनसेने भाजपच्या आयटी सेलची चांगलीच खिल्ली उडवली आहे. राज यांनी बनवलेल्या व्यंगचित्रात ‘नमो भक्त’ दाखवण्यात आला होता, मात्र भाजपाने या भक्ताला चक्क ‘नमो रूग्ण’ म्हणून संबोधले आहे. स्वत:च्या कार्यकर्त्यांना ‘रुग्ण’ म्हणल्याने भाजपा चांगलीच ट्रोल झाली आहे.

सवर्ण आरक्षणाच्या मुद्यावरून राज यांनी मोदींवर टीका केली असून मोदी ‘नव्या थापां’ची पतंग उडवत असल्याचे दाखवले होते. या व्यंगचित्राला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. ‘संक्रांत! बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच…’ अशा शिर्षकाचे व्यंगचित्र भाजपाने बनवले आहे. राज यांनी बनवलेल्या व्यंगचित्रात फेरफार करून हे व्यंगचित्र बनवले आहे. या व्यंगचित्रात राज गच्चीवरून पतंग उडवत असल्याचे दाखवत त्यांच्या पतंगीवर ‘राज एक कटी पतंग सर्व मुद्दे वापरून झाले‘, असे लिहीले आहे. राज यांच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काही मीडिया आणि मराठी माणून हातात फिरकी पकडून उभे असलेले दाखवण्यात आले आहेत. शरद पवार आणि काही मीडिया राज यांना ‘उडवा’ असे सांगत आहेत.

व्यंगचित्रात गच्चीवर राज यांचे अनेक कटलेले पतंग दाखवले आहेत. बेगडी मराठी प्रेम, टोलचा झोल, बारामतीची पोपटपंची, नकली पाक विरोध, फेरीवाला विरोधात स्टंट आंदोलन, ब्ल्यू प्रिंटच्या थापा, राजाला साथ द्या, बाळासाहेबांचा सूप आणि मराठी पाट्यांचे नौटंकी आंदोलन असे पतंगांवर लिहीले आहे. व्यंगचित्राच्या कोपरयात पोपट असून त्याला राज यांचा चेहरा लावण्यात आला असून त्यावर ‘बोलघेवडा’ लिहीले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button