breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रहाटणी फाटा येथील फुटपाथवर रात्रीत टाकला ‘राडारोडा’, नागरिकांचे हाल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रहाटणी फाटा येथे फुटपाथवर मध्यरात्री राडारोडा टाकण्यात आला आहे. हा राडारोडा कोणी टाकला हे अद्याप समोर आले नाही. परंतु, यामुळे फुटपाथवरून येणा-या-जाणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी मार्गावर वाढलेला बकालपणा वेळोवेळी हटविला आहे. हातगाड्या, टप-या हटविण्यात आल्या आहेत. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा त्याच व्यवसायिकांच्या हातगाड्या आणि टप-या याठिकाणी लावल्या जातात. त्यामुळे प्रभागातील बकालपणा वाढत आहे.

त्यातच रहाटणी फाटा येथे साई भाजी मंडईच्या बाजुला फुटपाथवर शुक्रवारी मध्यरात्री राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर बनविलेल्या फुटपाथवर पुन्हा बकालपणा वाडत आहे. बाजुलाच कचरा कुंडी असल्याने कचरा टाकण्यासाठी येणा-या-जाणा-या नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. तसेच, भाजी मंडईत पायी जाणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

रहाटणी फाटा येथील बीआरटी मार्गालगतच्या फुटपाथवर मध्यरात्री जवळपास 10 ते 15 ट्रॅक्टर राडारोडा टाकण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी फुटपाथची स्वच्छता करून घेतली होती. त्यावर हा राडारोडा टाकल्याने प्रभागात पुन्हा बकालपणा वाढत आहे. प्रशासनाने संबंधीतांवर कारवाई करायला हवी.

कैलास बारणे, गटनेता, पिंपरी-चिंचवड महापालिका
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button