breaking-newsपुणेमहाराष्ट्र

निर्माल्य संकलनाला चांगला प्रतिसाद

२८ विसर्जन घाटांवर २८ टन निर्माल्य गोळा

लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रविवारी तब्बल २८ टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४० लायन्स क्लबच्या एक हजाराहून अधिक सदस्यांनी २८ विसर्जन घाटांवर उभे राहून गणेशभक्तांना निर्माल्य दान करण्याचे आवाहन करत निर्माल्य संकलन केले.

विठ्ठलवाडी, राजाराम पूल, दत्तवाडी, एस. एम. जोशी पूल, पुलाची वाडी, लकडी पूल विठ्ठल मंदिर, अमृतेश्वर, संगम, होळकर घाट, वडगाव कॅनॉल, पर्वती कॅनॉल, सारसबाग, मार्केट यार्ड, धनकवडी, कात्रज, बिबवेवाडी, वारजे, औंध, रहाटणी, मोरया गोसावी घाट, आकुर्डी येथील गणेश तलाव

आकुर्डी या ठिकाणी हा उपक्रम राबविला गेला. संकलित झालेले निर्माल्य खतनिर्मितीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले.

सर्व क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांचे लायन्स स्वयंसेवकांना सहकार्य लाभले. गेली १४ वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाद्वारे आपली नदी आणि जलस्रोत स्वच्छ राखण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या कामात महापालिकेला मोलाची मदत झाली असल्याचे लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते धनकवडी येथे निर्माल्यदान उपक्रमाचे उद्घाटन झाले.

उपप्रांतपाल अभय शास्त्री, राजकुमार राठोड, मुकुंद खैरे, विक्रम शिंदे, पराग देशपांडे, आनंद आंबेकर, अ‍ॅड. बिपीन पाटोळे, राजेंद्र गोयल, डॉ. सतीश देसाई, संतोष पंडित, भरत जैन, प्रदीप पानघंटी या वेळी उपस्थित होते. संकलित झालेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मानाच्या गणपतींवर पुष्पवृष्टी

  • रांगोळीच्या पायघडय़ा आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत पुष्पवृष्टी करण्यात आली. या वर्षी प्रथमच विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आल्याने गणेशभक्तांनी या उपक्रमाला जल्लोषात प्रतिसाद दिला. एरो लिप एव्हिएशनतर्फे ही पुष्पवृष्टी करण्यात आली.
  • पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नांतून आणि राष्ट्रशक्ती संघटनेच्या संकल्पनेतून हा दिमाखदार सोहळा झाला. एरो लिप एव्हिएशनचे संचालक प्रताप निकम आणि राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी तीन वाजता पुणे विमानतळावरून निघालेल्या हेलिकॉप्टरने तीन वाजून दहा मिनिटांनी अलका चित्रपटगृहाच्या चौकात पोहोचून मानाच्या पहिल्या कसबा गणपतीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मानाचे सर्व गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई गणपती आणि राजाराम मित्र मंडळाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button