breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपुणेराजकारण

कोरोनामुळे होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आदेश

पुणे |

राज्यात तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा (कोविड-19) संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे 28 मार्च 2021 रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच 29 मार्च 2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा (कोविड-19) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता, नागरिकांनी पालन करावयाचे आवश्यक ती मानद कार्यप्रणालीनुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे.

वाचा-  आमिर खान करोना पॉझिटिव्ह; उद्धव ठाकरेंसोबत लावली होती कार्यक्रमाला हजेरी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button