breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी प्राधिकरणातील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी |महाईन्यूज|

निगडी प्राधिकरणातील ग.दि माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण येथे उभारण्यात येत आहे. नाट्यगृहाची असनक्षमता 800 इतकी आहे. नाट्यगृहाचे काम लॉकडाऊनच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाले असून या कामाची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. दरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिका-यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून हे काम बंद होते. मात्र, अनलॉकनंतर पुन्हा जोमाने कामाला सुरुवात झाली आहे. या नाट्यगृहामध्ये 220 प्रेक्षक बैठक व्यवस्था असलेले एक लहान सभागृह, 110 बैठक व्यवस्था असलेले कॉन्फरन्स हॉल व कलादालन, तसेच 12 निवासी खोल्या बांधण्याचे नियोजन आहे.

नाट्यगृहात आधुनिक पध्दतीचे विद्युत व्यवस्था, ध्वनी व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी अँम्पीथिएटर, रेस्टॉरंटची सोय देखील करण्यात येणार आहे. नाट्यगृहाचे बांधकाम करताना जेष्ठ आणि अनुभवी कलाकारांनी सुचविल्याप्रमाणे आवश्यक त्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिरणातील पेठ क्रमांक 26 मधील पाच हजार चौरस मीटर भुखंडावर गदिमा नाट्यगृह उभारले जात आहे. सध्या फ्लोअरिंग, विद्युतविषयक कामे, इंटेरिअर अशी अंतर्गत कामे वेगाने सुरु आहेत. मुख्य नाट्यगृह, मिनी थिएटरचे बांधकाम झाले आहे, तसेच कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया, निवासी खोल्याचे व बाह्य सजावटीचे काम पुर्णत्वाकडे चालु आहे. नाट्यगृहाचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे.

नाट्यगृहाची वैशिष्ट्ये –

आसनक्षमता, मुख्य नाट्यगृह – 800, मिनी थिएटर – 220, वाहनतळ क्षमता, चारचाकी – 400, दुचाकी – 265, कलाकारांसाठी 12 खोल्या, कलादान – स्थानिक कलाकरांच्या सरावासाठी स्वतंत्र हॉल, कॉन्फरन्स हॉल, उपहारगृह

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button