breaking-newsटेक -तंत्र

व्हिडिओ कॉलिंग ऍप Meetसाठी Google कडून खास टिप्स

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या महामारीच्या काळात संपूर्ण जग डिजिटल होताना दिसत आहे. कंपन्यांची अनेक कामे ऑनलाईनद्वारे होत आहेत. शिवाय अनेक कामा संबंधित बैठका देखील व्हिडिओ कॉलिंग ऍपच्या माध्यमातून होत आहेत. सध्या फक्त कंपन्यांची कामचं नाही तर शिक्षण देखील ऑनलाईन झालं आहे. त्यामुळे या ऑनलाईन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी Google कडून व्हिडिओ कॉलिंग ऍप Meet ला काही खास टिप्स देण्यात आल्या आहेत.

सर्वात आधी तुमचं बॅकग्राऊंड ठरवा

सर्वात आधी तुमचं बॅकग्राऊंड ठरवा

G Suiteचे गट उत्पादन व्यवस्थापक समीर प्रधान यांच्या सांगण्यानुसार व्हिडिओ कॉलिंग करताना बॅकग्राऊंड निश्चित करा. त्यासाठी एक अशी जागा निवडा त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही

  2/5

बॅकग्राऊंड ब्लर करू शकता

बॅकग्राऊंड ब्लर करू शकता

कंपनीच्या सांगण्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये कंपनी ऍपमध्ये अनेक नवे बदल करण्याच्या विचारात आहेत. यामध्ये तुम्ही व्हिडिओ कॉलिंग दरम्यान बॅकग्राऊंड ब्लर करू शकता. शिवाय तुमच्या आवडीचा एखादा फोटो तुम्ही बॅकग्राऊंड म्हणून वापरू शकता.   

  3/5

कॉलिंगदरम्यान तुम्ही स्वतःला पाहू शकता

कॉलिंगदरम्यान तुम्ही स्वतःला पाहू शकता

समीर प्रधान यांच्या सांगण्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये ४९ लोकांसोबत  व्हिडिओ कॉलिंग सुरू असताना तुम्ही स्वतःला देखील पाहू शकता. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button