breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आरपीआय (आठवले) युवक आघाडी वाकड शाखेचे उदघाटन

– युवक आघाडीचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणी

पिंपरी | प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने प्रभाग क्र २५ काळाखडक, पुनावळे, वाकड शाखेचे भव्य शाखा उदघाटन झाले. या वेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वेळी महासचिव बाळासाहेब भागवत, शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, युवकाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, अजिज शेख, ख्वाजाभाई शेख, विनोद चांदमारे, सुजित कांबळे, दुर्गाप्पा देवकर, बाळासाहेब शिंदे, किशोर पाटेाळे, किरण जाधव, किशोर खंडागळे, शंकर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

युवक आघाडीचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागताच त्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून शाखा उदघाटनांचा धडाका लावला. आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यांच्याच पुढाकारातुन या शाखेचे उदघाटन  करण्यात आले. युवा कार्यकर्ते शाहरूख खान यांची पिंपरी-चिंचवड शहर युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदी व राहुल चव्हाण यांची प्रभाग क्रमांक २५ च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्यासमवेत काळाखडक येथील शेकडो तरूनांनी सामूहिक पक्ष प्रवेश केला.

कार्यकारिणी खालील प्रमाणे उपाध्यक्ष अक्षय नवले, कार्याध्यक्ष रामेश्वर बोकेफोडे सचिव- श्रवन लष्करे, सहसचिव- बबलु रोकडे, सल्लागार- अभिजीत ढोबळे, कोषाध्यक्ष- आनंद वाल्मिकी, संघटक- सागर घुगे, सहसंघटक- विजय दुनघव यांना मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करीत नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button