breaking-newsपिंपरी / चिंचवड

निगडीत कोयत्याचा धाक दाखवून ८० हजार रुपये लंपास

निगडी– आपआपसात भांडण झाले असल्याचे दाखवून दोघांनी देशी दारुच्या मालकाल कोयत्याचा धाक दाखून ८० हजार रुपये लंपास केले. ही घटना शुक्रावारी (दि.५) रात्री नऊच्या सुमारास थरमॉक्स चौक चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी साजन हरिदास धंन्दर (वय २८) रा. निगडी गावठाण यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, साजन हरिदास धंन्दर यांचे थरमँक्स चौकात देशी दारु विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्रीच्यासुमारास दुकानामध्ये दोन अनोळखी दोघे जण आले. दोघांनी आपल्यात भांडण झालेल्याचे दाखून, साजन यांना कोयत्याचा धाक दाखवला व ८० हजार रुपायांचा रोकड आणि दोन हजार रुपायांचा मोबाईल ८२ हजार रुपायांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास निगडी पोलीस करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button