breaking-newsताज्या घडामोडी

नाशिक विभागात २ लाख १६ हजार ३७५ परीक्षार्थी दहावीच्या परिक्षेला हजर

 नाशिक | महाईन्यूज |

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेस मंगळवारपासून म्हणजे आजपासून सुरवात होत आहे. नाशिक विभागात २३४ केंद्रांवर दोन लाख १६ हजार ३७५ परीक्षार्थी आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहावे, अशी सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.

दहावीची परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करण्यात आले. मार्गदर्शनपर व्याख्यान, कार्यशाळांच्या माध्यमातून कॉपीमुक्त, तणावमुक्त परीक्षेविषयी प्रबोधन करण्यात आले. या सर्व उपक्रमांचा कितपत परिणाम विद्यार्थ्यांवर झाला, हे परीक्षेला सुरुवात झाली म्हटल्यावर दिसून येईलच.

यंदा नाशिक विभागात दोन हजार ७२६ माध्यमिक शाळांमधून दोन लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये नाशिक (९७,९१२), जळगांव (३१,८३५), जळगांव (६४,०५०)

आणि नंदुरबार (२२,५७८) विद्यार्थी आहेत. परीक्षा काळात कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी २८ भरारी पथके २३४ परीक्षा केंद्रांवर काम पाहणार आहेत. बारावीच्या परीक्षेतील कॉपीचे प्रकार पाहता दहावीच्या परीक्षेत कॉपीचा एखादा प्रकार आढळल्यास परीक्षकांवर, पाच प्रकरणे आढळल्यास केंद्र चालकांवर आणि सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्र संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button