breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सिंहगड घाटरस्त्यावरील संरक्षक जाळ्यांसाठी वन विभागाकडून एक कोटींचा निधी

सिंहगडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर १८ धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत दोन टप्प्यातील काम झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी वन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला एक कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार पीडब्ल्यूडीकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

सिंहगड  घाटरस्त्यावर पावसाळ्यात कडे, कपारीतील सैल झालेले दगड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पीडब्ल्यूडीकडून दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत घाटातील धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील जाळ्या बसवण्याचे काम झाले असून तिसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईकडून सिंहगडाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानंतर या संस्थेकडून पीडब्ल्यूडीला एक अहवाल देण्यात आला आहे. या अहवालात गडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्यातील धोकादायक ठिकाणी दरड प्रतिबंधक कामे सुचवण्यात आली आहेत. घाट रस्त्यात एकूण १८ ठिकाणे धोकादायक असून या ठिकाणी दरड प्रतिबंधक कामे करण्यासाठी २८ कोटी रुपयांची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button