breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…अन्यथा महावितरणवर फौजदरी दाखल करू! सत्यजित देशमुख यांचा इशारा

शिराळा, दि. २९ (प्रतिनिधी)  कणदूर ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या जागेत विद्युत महावितरण कंपनीने बांधलेले वीज उपकेंद्र कोणतीही परवानगी न घेता बांधले आहे. ग्रामपंचायतीस या जागेचा मोबदला म्हणून सदरची जागा ग्रामपंचायतीकडून भाडेपट्ट्यावर घ्यावी. मागील २०१२ पासून चे भाडे जमा करावे अन्यथा महावितरण कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी दिला.

कणदूर ता.शिराळा येथील ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या जागेत महावितरण कंपनीने वीज उपकेंद्राचे भाडे ग्रामपंचायतीस न भरल्याच्या निषेधार्थ कणदूर ग्रामस्थांच्या वतीने उपकेंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. या दरम्यान वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याबरोबर तहसिलदार कार्यालय शिराळा येथे बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, कणदूर सर्व्हे नं.२१८ मधील दोन एकर जागा महावितरण कंपनीने ग्रामपंचायत मालकीची घेतली आहे. याबाबत ग्रामपंचायतीशी कोणताही पत्र व्यवहार ठराव घेतलेला नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही बांधकाम परवानगी मागितलेली नाही. तसेच बांधकाम विभागाची परवानगी न घेता अनिधीकृत बांधकाम केले आहे. याबाबतची ठोस कागदपत्रे देखील वीज वितरण कंपनीकडे नाही. गेली ६ वर्षापासून या जागेचा वापर विना मोबदला महावितरण करत आहे, एक रुपयाचा मोबदला देखील ग्रामपंचायतीस भरलेला नाही. हे सर्व तात्काळ भाडेपट्टा करून रितसर रेटी रेक्नर प्रमाणे भाडे भरावे व संबंधित बांधकामाच्या परवानग्या रितसर कराव्यात. मागील ६ वर्षाचे भाडे एकरक्कमी ग्रामपंचायतीस जमा करावे अन्यथा याबाबत महावितरण कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून या उपकेंद्राच्या बाबत वरिष्ठाकडे तक्रार करू. यावेळी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारला व रितसर भाडेपट्टा करून घ्या अशी मागणी केली.

यावेळी नायब तहसिलदार उदय पवार, शिराळा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी सावळे, उपअभियंता फुगसे, एन.एम.दिवटे, शिराळा महावितरण उपअभियंता बुचडे, उपसरपंच आनंदराव पाटील, संपत पाटील, संजय पाटील, माजी सरपंच संजय पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, रंगराव पाटील, पी.जी.पाटील, रामदास गुरव, बाबा गवळी, विष्णू पाटील, गणेश रसाळ, निवास पाटील, शितल कुराडे, लक्ष्मण पाटील, वसंत पाटील, योगेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ- शिराळा तहसिल कार्यालयात महावितरण कंपनी व कणदूर ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली, यावेळी सत्यजित देशमुख उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button