breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी शिंदे सरकारची मोठी खेळी! जाहीर केली ‘ही’ यादी

मुंबई : राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. सध्या राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. अजित पवार सत्तेत सहभागी होताच भाजप आणि शिंदे गटातील आमदार मंत्रीपदावरून नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटातील काही आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पालकमंत्रीपदाचा वाद होऊ नये यासाठी राज्य सरकारने नवा मार्ग काढला आहे. राज्य सरकारने १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी यादी जाहीर केली आहे.

भारताचा स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट आता जवळ आलाय. या दिवशी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार? असा प्रश्न होता. या प्रश्नावर शिंदे सरकारने तोडगा काढला आहे. पालकमंत्रीपदाचा वाद होऊ नये यासाठी राज्य सरकारने नवा मार्ग काढला आहे. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही, तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘विरोधकांनी I.N.D.I.A चे तुकडे केले’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र

१५ ऑगस्टला कोण कुठे झेंडावंदन करणार?

देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button