breaking-newsताज्या घडामोडी

नाशिकच्या झोपडपट्टीत भीषण आग

नाशिक | नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला आज सकाळी अचानक भीषण आग लागली असून या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर एकामागोमाग एक सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला.

आग आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील रहिवाश्यांमध्ये एकच धावपळ उडाली. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील संतप्त रहिवाश्यांनी दोन अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे. नाशिकच्या गंजमाळ येथील भीमवाडीत सकाळी साडे नऊच्या सुमारास ही लागली. भीमवाडी झोपडपट्टीत पत्रे आणि लाकडांची घरे असल्याने आगीने भराभर पेट घेतला. त्यातच काही घरांमधील सहा ते सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. अचानक लागलेल्या या आगीमुळे भीमावाडी झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी जीवमुठीत घेऊन तात्काळ घराबाहेर धाव घेतली.

तर वस्तीतल्या काही तरुणांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीने अधिकच रौद्ररुप धारण केल्याने २० ते २५ झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अवघ्या दहा मिनिटातच आगीचे आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील लोक भयभीत झाले. नाशिक पालिका आणि नाशिक रोड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मात्र, येथील चिंचोळ्या गल्ल्यांमुळे अग्निशमन दलालाही आग विझताना प्रचंड अडचणी येत होत्या. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी सात घरांवर उभे राहून वेगवेगळ्या बाजूने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button