breaking-newsमुंबई

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कापला ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस शुक्रवारी पार पडला. या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी ५१ किलो ईव्हीएमचा केक कापला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ५१ किलोचा ईव्हीएम केक आणला होता. जो राज ठाकरेंनी कापला. राज ठाकरेंचा ५१ वा वाढदिवस होता त्यानिमित्त हा केक कार्यकर्त्यांनी आणला होता जो कापण्यात आला. राज ठाकरे यांनी ईव्हीएमला विरोध दर्शवणारा हा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आणि भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र भाजपाचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. त्यानंतर ईव्हीएमबाबत चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र राज ठाकरे यांची काही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. निकालाच्या दिवशी अनाकलनीय एवढी एका शब्दाची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. आता वाढदिवसाच्या दिवशी ईव्हीएमचा केक कापून त्यांनीही या पद्धतीला विरोध दर्शवला आहे असेच म्हणावे लागेल.

वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या पत्नीसह सिद्धिविनायक मंदिरात गेले होते. तिथे गणपतीबाप्पापुढे राज ठाकरे नमस्तक झाले. त्यानंतर साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला. दरम्यान कार्यकर्ते जेव्हा ईव्हीएमचा ५१ किलोंचा केक घेऊन आले तेव्हा तो कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री पायल रहतोगीचा निषेध करणारा केकही यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आणला होता.  राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी ज्या दहा सभा घेतल्या त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र त्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झालेले पहाण्यास मिळाले नाही. आता विधानसभेच्या वेळी राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button