TOP Newsताज्या घडामोडी

नाशकातील गोदावरी नदीवर दररोज निनादणार महाआरतीचे सूर

अयोध्येतील शरयू नदीच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर आता नाशकातील गोदावरी नदीची महाआरती केली जाणार आहे. रोज संध्याकाळी ही महाआरती होईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या महापूजेसाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी दिला जाणार आहे. शिवाय ११ पुजाऱ्यांची नेमणूकदेखील केली जाणार आहे.

सांस्कृतिक मंत्र्यांच्या या घोषणेनंतर संध्याकाळी सात वाजता गोदावरी नदीवर आरतीचे सूर निनादणार आहेत. गोदावरी नदीच्या काठावर नाशिक शहर वसलेलं आहे. याठिकाणी कुंभमेळादेखील भरत असतो. शहरातून वाहणाऱ्या या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. गंगा नदीप्रमाणेच गोदावरी नदीलादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाशकातील त्र्यंबकेश्वर हे तीर्थस्थान देशभरात प्रसिद्ध आहे.

पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांच्याकडून गोदावरीच्या नदीच्या महापूजेसाठी पाठपुरावा केला जात होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अयोध्या, वाराणसी, हरिद्वारप्रमाणेच आता गोदावरीचीही महाआरती दररोज केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button