breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेने करवाढ मागे घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु – संभाजी ब्रिगेडचा इशारा

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेली करवाढ ही मागे घ्यावी, जून्या रहिवाशांना माथी मारण्याचे महापाप सत्ताधारी भाजप आणि आयुक्त हर्डिकर हे करु लागले आहेत. त्यामुळे ही करवाढ मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रविण कदम यांनी दिला.

आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले की, पिंपरी चिंचवड शहरातील 2007 पूर्वी जून्या इमारती, ज्यांनी फ्लॅटचा ताबा घेतला आहे. अशा सर्व रहिवाश्यांना 2020-2021 पासून दर वर्षी अडीच पटीने प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागणार आहे. ही वाढ खूपच जास्त व अनाठायी आहे. ज्यांनी 15 -20 वर्षा पूर्वी आपल्या आयपतीप्रमाणे 10 लाखाला फ्लॅट घेतला. त्याला आत्ता निविन इमारतीत एक कोटीला फ्लॅट घेणाऱ्या व्यक्ती इतका प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागणार आहे.

पिंपरी चिंचवड भागातील जुन्या सर्व भागात हा भुर्दंड लागू होणार आहे. त्या मुळे आकुर्डी गाव, पिंपरी गाव, अजमेरा कॉलनी, वल्लभ नगर, एम्पायर इस्टेट, चिंचवड गाव, भोसरी गाव येथील सर्वच रहिवाश्यांना हा फार मोठा कर दर वर्षी भरावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच घर भाडे ही वाढणार आहे. पिंपरी चिंचवड भागात राहणे महाग होईल. महानरपालिकेत एक रुपयाचे काम तीन रुपयात करून घेतले जाते. अधिकाऱ्यांना हताशी धरून कॉन्ट्रॅक्टर किती मोठ्या प्रमाणात महानगर पालिकेचां पैसा ओढत आहेत.

आयुक्त साहेब प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्या पेक्षा महानगर पालिकेचा कारभार अधिक पारदर्शी करावा. ही करवाढ मागे घ्यावी. ह्यासाठी सर्व सोसायट्यांनी एकत्र येऊन ह्या विरूद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. ते काम संभाजी ब्रिगेड प्रत्येक विभागात जाऊन या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देणार आहे. हा लोकलढा संभाजी ब्रिगेड लढनार आहे. जनतेच्या भावनेशी प्रस्थापित राजव्यवस्था खेळत असेल तर संभाजी ब्रिगेड स्वस्थ बसणार नाही. आयुक्त साहेब तातडीने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे. त्यात काहीही नुकसान झाल्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button