breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना भरघोस लाभ, 17.70 कोटींचा निधी वाटप

  • नागरवस्ती विकास योजना विभागाचा पुढाकार
  • 10 हजार 600 दिव्यांग लाभार्थ्यांचे कल्याण

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग नागरिकांसाठी राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांचा शहरातील हजारो दिव्यांग बांधवांना लाभ मिळाला. चालू आर्थिक वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून 10 हजार 600 लाभार्थ्यांना एकूण 17 कोटी 70 लाख 8 हजार 47 एवढ्या रक्कमेचा विक्रमी लाभ पालिकेने दिला.

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे निःसमर्थ अपंग कल्याणकारी योजनाद्वारे नऊ प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या लेखाशिर्षावर 27 कोटी 16 लाख रुपयांची तरतूद आहे. या योजनांचा 10 हजार 600 पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्यापोटी 17 कोटी 70 लाख 8 हजार 47 एवढा निधी वाटप करण्यात आला.

नागरिकांच्या कल्याणासाठी करोडो रुपयांचा निधी वाटप करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात एकमेव महापालिका आहे. सर्व घटकातील नागरिकांना लाभ देण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभाग कायम तत्पर असतो. सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीजास्त नागरिकांनी पालिकेकडे अर्ज करावेत, असे आवाहन समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button