breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांचा दणका; २०० पीएमपीएमएल कामगारांच्या बदल्या रद्द!

– पीएमपीएमएल कामगारांचा चार तासांचा हेलपाटा थांबणार
– आमदार लांडगे यांनी अवघ्या अर्ध्या तासात सोडविला प्रश्न

पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी पीएमपीएमएल डेपो मॅनेजरने २०० पीएमपीएमएल कामगारांच्या बदल्या कात्रज बस डेपोला केल्या होत्या. गैरसोयीच्या बदल्या केल्याने बस चालक चिंतेत होते. मात्र आमदार महेश लांडगे यांनी संबंधित प्रकारात लक्ष घालून या बदल्या त्वरित रद्द करण्याच्या सुचना डेपो मॅनेजरला दिल्या. तसेच कामगारांना नाहक त्रास न देण्याची देखील सूचना केली. आमदार लांडगे यांच्या दणक्याने अखेर बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बस चालकांना होणारा नाहक त्रास थांबणार असुन त्यांनी आमदार लांडगे यांचे आभार मानले.

विशाल गिरी यांनी सांगितले, पीएमपीएमएल डेपो मॅनेजरने चुकीचे कारण दाखवत २०० कामगारांच्या बदल्या बदल्या कात्रज, वानवडी, हडपसर या लांब ठिकाणी केल्या होत्या. भोसरी डेपो मध्ये कंत्राटदाराची लोक नियुक्त करण्याच्या उद्देशाने या या बस चालकांच्या बदल्या लांब केला असल्याचा आरोप कामगारांनी केला. या बदल्या गैरसोयीच्या असल्याने जायला दोन तास, यायला दोन तास व मध्ये अर्धा तास असे एकूण साडेचार तास विनाकारण लागणार होते. प्रवासाचा आणि बस चालवण्याचा वेळ अधिकचा भरणार होता. त्याचा बस चालकांना मानसिक त्रास सहन करावा लागणार होता. बदल्या झाल्यामुळे अनेक बस चालक नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत होते. बायको व पोरांचे हाल होण्यापेक्षा कायमचे गावी जातो, अशा चर्चा बस चालक आपल्या मित्रांशी करत होते. या वेळी गिरी यांचे मित्र सुभाष फाकटकर यांनी बस चालकांना आमदार महेश लांडगे यांना भेटण्याचा सल्ला दिला. ते तुम्हाला न्याय देतील, अशी माहिती फाकटकर यांनी दिली. .

त्यानंतर गिरी आणि त्यांच्यासह असणारे १०० कामगार सकाळी आमदार लांडगे यांना कार्यालयात जाऊन प्रत्यक्षात भेटले. आमदार लांडगे यांना सर्व वृत्तान्त सांगितला. भोसरी डेपो मध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. डिझेल गॅस डेपो जवळ आहे. असे असतानाही भोसरी डेपो मॅनेजर वरून आमच्या बदल्या करून सुमारे २०० कामगारांच्या ते बदलय करत आहेत. त्या बदल्यात या डेपोमध्ये कंत्राटदाराकरवी भरती करण्याचा मानस त्यांचा आहे. त्यामुळे लोकांच्या पण अडचणी वाढणार आहेत.

कामगारांचे मत ऐकल्यानंतर आमदार लांडगे यांनी सर्व कामगारांना दिलासा देऊन बदलीची ऑर्डर रद्द करसाचे आश्वसन दिले. त्यानुसार आमदार लांडगे यांनी संबंधित डेपो मॅनेजरला कामगारांच्या केलेल्या गैरसोयीच्या बदल्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व सुविधा असताना कामगारांबाबत राजकारण न करण्याच्या सुचनाही आमदार लांडगे यांनी दिल्या. त्यांच्या सूचनेनंतर अर्ध्या तासात अन्यायकारक बदल्यांची ऑर्डर रद्द केली. दोनशे कामगारांना त्यांनी न्याय व दिलासा दिला. कामगारांच्या नागरिकांच्या अडचणी दूर केल्या वरुन चालणारे राजकारण थांबून व ह्या कामगारांचा बदल्यात कंत्राटदाराकरवी होणारी कामगार भरती थांबवली. कामगारांना न्याय दिल्याबद्दल कामगारांनी आमदार लांडगे यांचे आभार मानले.

आमदार महेश लांडगे यांचा करणार सत्कार
गिरी गोसावी समाजाचे नेतृत्व करतात. सर्व कामगार आमदार महेश लांडगे यांचे आभार मानून त्यांचा भव्य सत्कार डेपो मध्ये करणार आहेत. आमदार लांडगे यांनी केलेल्या धडक कारवाईचे सर्वांनी मनापासून अभिनंदन केले. आमदार लांडगे यांना पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. तसेच आपल्या पाठीशी राहणार असल्याचे कामगारांनी सांगितले.

आमदार लांडगे यांचे ऋणी आहोत.
लॉक डाऊन मुळे कामगारांची मनस्थिती बिघडलेली होती. त्यामधेच हे.बदल्यांचे सुरु झाले. त्यामुळे आणखीन मानसिक त्रास सहन करावा लागणार होता. लहान मुलांच्या शाळेत बदल, जाण्याचा व येण्याचा त्रास, कात्रजला जायला सव्वा तास यायला सव्वा तास हा सर्व मुलाबाळांचा त्रास आमदार लांडगे यांनी थांबविला, असे मत कामगारांनी व्यक्त केले. घरातील मुले व नातेवाईक देखील खुश झाले.

आमदार लांडगे यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जाण्याच्या सूचना बस चालकांना केल्या. आमदार लांडगे यांच्या हस्तक्षेपाने बस चालकांचे प्रश्न त्वरित सुटले आहेत. त्यामुळे सर्व कामगार कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुलेही आमदार लांडगे यांना भेटून त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा आग्रह धरत आहेत.
– सुभाष फाकटकर, सेक्टर ३, गुरुविहार कॉलनी, पांजरपोळ समोर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button