breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नागरिकत्व सुधारणा कायदा : ‘शरणार्थी’ म्हणून जीवन जगणाऱ्यांचा सन्मान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून विधेयकात सुधारणा करण्याचे संकेत

दुमका, झारखंड । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

ज्या लोकांना (पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्यक समुदाय) भारतात पळून गेले आहेत आणि त्यांना शरणार्थी म्हणून जगण्यास भाग पाडले गेले आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी, संसदेच्या दोन्ही सदस्यांनी कायदा (नागरिकत्व सुधारणा) संमत केला, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेहली बार, जो काम पाकिस्तान हमेशा करता था। वो कांग्रेसवालो ने किया, इससे ज़्यादा शर्म की बात क्या क्या है? क्या दुनिया के देशो में भारत कीही दुतावास के समने, कभी कोई भारत का व्यक्ति निदर्शन करता है क्या?, असा घणाघातही मोदी यांनी केला.

दरम्यान, विविध राज्यांकडून विरोध होत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात बदलांचे संकेत दिले आहेत. झारखंडच्या धनबाद येथील एका सभेमध्ये ते बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये या आंदोलनांना हिंसक वळण लागले. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह ७ राज्यांनी हे विधेयक आपल्या राज्यात लागू करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यानंतरच गृहमंत्री अमित शहा यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button