breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, विरेंद्रसिंह तावडेचा जामीन फेटाळला

पुणे –   अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा साधक विरेंद्रसिंह तावडे याचा जामीन विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी फेटाळून लावला आहे. या पूर्वीही तावडेचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.

विरेद्रसिंह तावडे, विनय पवार आणि सारंग अकोलकर आणि इतरांच्या मदतीने  दाभोलकरांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याने दोन वर्षापूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुदगार काढतात, चमत्काराला आव्हान देतात. याच कारणांमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले होते.

या प्रकरणात गेल्‍या दोन वर्षापासून तावडे अटकेत असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, त्याच्या बोलण्यामध्ये तफावत आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही अद्याप जप्त करण्यात आली नाही. सीबीआयने केवळ संशयावरून तावडेला अटक केली आहे. उच्च  न्यायालयाने त्याच्या आरोप निश्‍चितीसाठी स्थगिती दिली आहे. सीबीआयच्या तपासामध्येही प्रगती नसून त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केली. त्याला विरोध करताना शुक्रवारी विशेष सरकारी वकील मनोज चालदन यांनी विरोध करताना सांगितले, यापूर्वी एकदा तावडेचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button