breaking-newsविदर्भ

नागपूरची राष्ट्रीय खनिकर्म संस्था गुजरातला पळवली

नागपूर – महाराष्ट्रातील महत्त्वाचे उद्योग गुजरातला पळवण्याचा केंद्र सरकारने लावलेला सपाटा सुरूच आहे. त्यात त्यांनी आता नागपूरमधील राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने यासंदर्भात चकार शब्दही काढलेला नाही.

मध्य भारतातील खाण कामगारांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे संशोधन नागपूरच्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेत केले जात होते. मात्र आता या संस्थेचे कार्यालय आणि प्रयोगशाळा अहमदाबादला हलवली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमध्ये खाणकाम उद्योग आहेत. तेथील लाखो मजुरांच्या आरोग्यासाठी संशोधन करण्यासाठी २००२ मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने कर्नाटकातील ही संस्था नागपूला आणली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button