breaking-newsपुणे
पीएमपीएमएलची कारला धडक ; एकाचा मृत्यू
पिंपरी – भरधाव वेगातील पीएमपीएमएल बसने कारला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (9 जून) दुपारी 1.30 वाजता पुलगेट येथील बस स्टँडजवळ झाला.
धिरेन तिवारी (वय-36, रा.अमनोरा पार्क टाऊन, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी सुजाता धिरेन तिवारी (वय-35) यांनी लष्कर पोलीसात फिर्याद दिली असून पीएमपी चालक रमेश रामराव वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धिरेन तिवारी हे कारने कात्रज ते हडपसर दरम्यान प्रवास करत असताना पुलगेट बसस्टॉप जवळ पीएमपीने त्यांच्या कारला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने धिरेन यांचा मृत्यू झाला. पोलीस उप निरीक्षक कालगुडे अधिक तपास करीत आहेत.