breaking-newsआंतरराष्टीय

नवाज शरीफ यांच्यावर पाकिस्तानी सैन्य भडकले

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबईवरील हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली आहे. शरीफ यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानी सैन्य चांगलेच भडकले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची आपात्कालीन बैठक पार पडली असून या बैठकीत अडीच तास चर्चा झाली. त्यामुळे आगामी काळात शरीफ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला पाकचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा, स्टाफ कमिटीचे अतिरिक्त संचालक जनरल जुबैर महमूद हयात आणि आयएसआयचे लेफ्टनंट नवीद मुख्तार यांच्यासह पाकच्या नौदल, हवाई दलाचे अधिकारी तसेच गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही उपस्थित होते. अब्बासी यांच्या निवासस्थानीच अडीच तास ही बैठक चालली.

या बैठकीनंतर अब्बासी यांनी नवाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेदरम्यानचा तपशील कळू शकला नाही. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य शरीफ यांनी केलं होतं. त्यावरून पाकमध्ये खळबळ उडाली होती. ही कबुली अंगलट आल्यानंतर शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षानं त्यांची बाजू घेत सारवासारव केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button