breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी ज्योत्स्ना शिंदे

पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक ज्योत्स्ना शिंदे यांची वर्णी लागली आहे. शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी पदावनत झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांना राज्य सरकारने पाच महिन्यापूर्वी पदावनत केले होते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 डिसेंबर 2017 मध्ये आवारी यांची पदोन्नती रद्द केली होती. त्यांना पुण्यातील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयात उपशिक्षणाधिकारी (गट ‘ब’) या पदावर पदावनत करण्यात आले. त्यामुळे आवारी यांना महापालिकेतील शिक्षण मंडळ विभागातून सोमवारी (दि.21) कार्यमूक्त करण्यात आले होते. त्यामुळे शिक्षण मंडळाचे विभागाचे प्रशासन अधिकारीपद रिक्त होते.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज (गुरुवारी) गट ‘अ’ मधील शिक्षणाधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक ज्योत्स्ना शिंदे यांची पिंपरी पालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button