breaking-newsराष्ट्रिय

नलिनी चिदंबरम यांना पुन्हा समन्स

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांना ईडीने पुन्हा शारदा चीटफंड घोटाळा प्रकरणात समन्स जारी केले आहेत. त्यांना येत्या 20 जून ईडीच्या कोलकाता कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या आधी त्यांना याच प्रकरणात 7 मे रोजी बोलावण्यात आले होते. मनी लॉंड्रीगच्या या प्रकरणात त्यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

यापुर्वीही अनेक वेळा त्यांना या प्रकरणात समन्स जारी करण्यात आली होती पण त्यांनी या समन्सला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सीआरपीसीच्या कलम 160 अंतर्गत महिलेला चौकशीसाठी ती ज्या शहरात राहते आहे त्याच्या बाहेर बोलावले जाऊ शकत नाही अशी तरतूद आहे. त्या तरतूदीच्या आधारे त्यांनी या समन्सला आव्हान दिले होते. परंतु कोर्टाने हे कलम परिस्थितीजन्य बाबीवर अवलंबून आहे आणि महिलांना अशी सुट देण्याची सक्ती या कलमात नाही असे कारण देत कोर्टाने त्यांची ही आव्हान याचिका फेटाळली होती व त्यानुसार त्यांच्यावर पुन्हा समन्स जारी करण्याची सूचना ईडीला देण्यात आली होती.

नलिनी चिदंबरम यांची या प्रकरणात आधी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी झाली आहे. पण या प्रकरणातील तपासात काही नवीन बाबी समोर आल्याने त्यांचा पुन्हा जबाब नोंदवून घेण्याची गरज निर्माण झाल्याचा दावा ईडीने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button