breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“नर्सिंग होम सुरू न केल्यास नर्सिंग होमचे परवाने रद्द करू”, मुंबई पालिकेची डॉक्टरांना सक्त ताकीद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेच्या बहुतेक रुग्णालयात कोरोनाच्याच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत असून नर्सिंग होम आणि खासगी डॉक्टरांनीही त्यांचे दवाखाने बंद ठेवले आहेत त्यामुळे रुग्णांची आणखीनच गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर नर्सिंग होम (शुश्रुषा गृह, पॉलिक्लिनिक) चालक आणि खासगी डॉक्टरांना मुंबई पालिकेने सक्त ताकीद दिली आहे. नर्सिंग होम सुरू न केल्यास नर्सिंग होमचे परवाने रद्द करण्यात येईल, असा इशाराच दिला आहे…खासगी दवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला या नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. सोसायटी आणि चाळीच्या आवारात असलेले नर्सिंग होम किंवा खासगी दवाखाने सुरू करण्यास सोसायटी, चाळीतील रहिवाशी, घरमालक किंवा शेजाऱ्यांनी अडथळा आणल्यास त्यांच्यावरही साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करतानाच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही परदेशी यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

मुंबईतील सर्वच्या सर्व नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही पालिकेच्या २४ विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी. तर जे खासगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांची माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ नुसार कारवाई सुरू करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याच्या खातेप्रमुखांद्वारे म्हणजेच ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी’ यांच्याद्वारे विभागस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचं पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button