breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नद्यांमधील अतिक्रमण हटवण्याचा आराखडा सादर करा, अन्यथा एक कोटी दंड आकारणार – हरित लवादाचे आदेश

पवना, मुळा आणि इंद्रायणीचा आराखडा उद्या सादर होणार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी |

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून वाहणा-या नदी पात्रातील अतिक्रमण हटवण्याबाबत आराखडा सादर करावा, अन्यथा एक कोटीचा दंड आकारण्यात येईल, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून उद्या (गुरुवार दि.24 ) पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांतील अतिक्रमण हटवण्याचा सविस्तर आराखडा सादर करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या वाहणाऱ्या नदीच्या पात्रातील अतिक्रमण हटवण्यात यावीत, याकरिता 30 दिवसात सविस्तर आराखडा तयार करावेत, असे राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिकेसह अन्य सरकारी संस्थानी अहवाल सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहणा-या नदीपात्रातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या नदी पात्रात राडारोडा टाकण्यात येत आहे. त्यामुळे नैसर्गिक नदी पात्र अरुंद होवू लागले आहेत. याकरिता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नद्यांमधील अतिक्रमण हटवावे, हरित लवादाकडे तक्रार केलेल्या आहेत. त्यामुळे हरित लवादाकडून गंभीर दखल घेतलेली आहे.

त्यानूसार नद्यांमधील अतिक्रमण हटवण्याबाबत सविस्तर आराखडा मागितला आहे. हा अहवाल सादर न केल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) प्रत्येकी १ कोटी दंड आकारला जाईल, असेही राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे.

हरित लवादाने १ ऑक्टोबरला यासंदर्भात आदेश काढले होते. त्यामुळे मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या काठी झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचा अवधी स्थानिक संस्थांना देण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी यासंदर्भात कोणती कारवाई करणार, याचा आराखडा स्थानिक संस्थांना सादर करायचा आहे.

यासंदर्भातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हरित लवादाकडे पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमधील अतिक्रमण हटवण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आराखडा उद्या (गुरुवार दि. 24) हरित लवादाकडे सूपूर्द येणार आहे. त्यामुळे नद्यांमधील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार असून त्या अतिक्रमण धारकांवर काय? कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button