breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात मे महिन्यातच ६४ लाख कोरोनाबाधित : ICMR चा खुलासा!

नवी दिल्ली – देशामध्ये मे महिन्यापर्यंत सुमारे ६४ लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला मात्र त्यातील असंख्य रुग्णांचे निदान झाले नव्हते. यातून बरे झालेल्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

सर्वेक्षणात म्हटले आहे की…
मे महिन्यामध्ये कोरोनाचा एक रूग्ण जरी आढळून आला तरी वास्तवात सुमारे ८२ ते १३० जणांना बाधा झाली होती. परंतु त्यांचे निदान होऊ शकले नाही. हे सर्वेक्षण ११ मे ते ४ जून दरम्यान केले आहे. या काळात २८ हजार रुग्णांचे नमुने तपासले गेले. राष्ट्रीय स्तरावर सेरोचे प्रमाण मे महिन्यात ०.७३ टक्के इतके होते. कोरोना होऊन गेलेल्या पण त्याचे निदान न झालेल्या लोकांचे प्रमाण १८ ते ४५ वर्षे वयोगटामध्ये ४३.३ टक्के, ४६ ते ६० वर्षे वयोगटात ३९.५ टक्के व ६० वर्षे वयावरील लोकांमध्ये १७.२ टक्के इतके होते. मे महिन्यात साथीचा सुरुवातीचा टप्पा सुरू होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button