breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरगुती गॅस सिलेंडर दर पुन्हा भडकले

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  गेल्या कित्येक दिवसापासून महागाईने कळस गाठला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर भडकल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आठ महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल २८९ रुपयांची वाढ झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यातुलनेत देशांतर्गत पेट्रोल- डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थांचे दर कमी झालेले नाहीत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) दरातही सातत्याने वाढ होत आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा दर एप्रिलमध्ये ६४५ रुपये होता. जूनमध्ये तो ६९१, ऑगस्टमध्ये ७८४, तर नोव्हेंबरमध्ये ९३४ रुपयांपर्यंत पोचला. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांतच २८९ रुपयांची वाढ झाली आहे.

ज्या नोकरी करीत नाहीत, अशा महिलांना घरखर्च भागविणे जास्तच अवघड झाले आहे. केंद्र सरकार एकीकडे लाकूडफाट्यामुळे प्रदूषण होऊ नये म्हणून घरगुती सिलिंडरच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे सिलिंडर महाग होत आहे. मोठ्या कुटुंबाला महिन्याला दोन सिलिंडर लागतात. त्यांची जास्तच आर्थिक कोंडी होते. दुसरीकडे केरोसीन मिळणेही दुरापास्त झाले आहे.

– शुभदा कुलकर्णी, चिंचवड

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती उतरल्या आहेत. त्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी न होता उलट वाढत आहेत. सरकार एकीकडे केरोसीनमुक्तीकडे वाटचाल करण्यास सांगत आहे. दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. अशा परिस्थितीत सामान्यांना जगणे अवघड झाले आहे.

– मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button