breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी कापली जीभ आणि फोडले डोळे

लखीमपूर: कोरोनाच्या काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यात ईशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भयंकर प्रकार घडलेला आहे. शुक्रवारी पोलिसांना उसाचा शेतात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि रिपोर्ट पाहून पाया खालची जमीनच सरकली आहे. मुलगी खूपवेळ घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली त्यानंतर पोलिसात मुलगी घरी आली नसल्याची माहितीही दिली आहे. उसाच्या मळ्यात 13 वर्षांची अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडलेला आहे.

अल्पवयीन मुलगी शेतात शौचालयासाठी गेली होती. तिथून जाणाऱ्या गावातील दोन मुलांनी या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केलेली आहे. बलात्कारानंतर या तरुणांनी तिचे हाल केल्याचं दिसत होतं. जीभ कापली होती आणि डोळे फोडलेले होते. गळ्यातील ओढणीनं तिला खेचल्याचे व्रणही मृतदेहावर उठल्याचं दिसत होतं. उसाच्या शेतात हा मृतदेह फेकून दोघंही तरुण फरार झालेले आहेत. शवविच्छेदन अहवालात सामूहिक बलात्कार आणि गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button