breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना दिलासा; सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ

पिंपरी- कोरोना महामारी रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊन, आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना दिलासा देणारा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करण्यास महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी – चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. पिंपरी- चिंचवड औद्योगिक परिसरालगतच हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण, रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. संपूर्ण देशभरातून या भागात कामगार वर्ग रोजगारानिमित्त वास्तव्यास आहे.मात्र, या भागात अंतर्गत रस्ते, पाणी, वीज अशा मुलभुत सुविधा अद्यापही अपु-या आहेत. त्यामुळे येथील कामगार वर्ग पिंपरी – चिंचवड शहरात वास्तव्यास प्राधान्य देतो. याचाच परिणाम आयटी पार्क आणि एमआयडीसी लगतच्या पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखांवर पोहोचली आहे. सन 2007-08 मध्ये शहरात 2 लाख 54 हजार 247 मालमत्ता होत्या. सध्या 5 लाख 30 हजार मालमत्ता आहेत. यावरून शहराची वाढ लक्षात येते.कोरोना साथीमुळे शहरातील लहान-मोठे सर्वच उद्योग लॉकडाऊन कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी महापालिकेने विविध उपाययोजना उपलब्ध करून दिल्या आहेत.शहरातील सर्वच उद्योगधंदे बंद राहिल्याने त्याचा लघुउद्योजकांसह कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक अशा सर्वच घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या वर्गाला महापालिकेचा मालमत्ताकर भरणे अतिशय जिकीरीचे होत आहे.

शहरातील अनेक संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाकडे मालमत्ता करात सवलत देण्याबाबत मागणी केली होती. त्या अनुषंगाने शहरवासीयांना महापालिकेमार्फत दिलासा देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करण्यास उपसुचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

शहरातील वापरनिहाय मालमत्ता!
निवासी – 4, 50,168
बिगरनिवासी – 47,009
औद्योगिक – 3702
मोकळ्या जमीन – 8838
मिश्र – 15,848
इतर – 5,222
————————
एकूण- 5,30,787

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button