breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! वसईमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेशमधील तरुणाला अटक

मुंबई: भारतासमोर कोरोना विषाणूचे महासंकट उभं असताना देशातील विविध ठिकाणी बलात्काराच्या धक्कादायक घटनांची पुनरावृत्ती सुरूचं आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशात अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना समोर येत चालल्या आहेत. अशातचं आता पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील 25 वर्षीय तरुणाला अटक केलेली आहे.

पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुकेश असं या आरोपीचं नाव असून तो वसईतील देवतलाव येथील लाकडाच्या वखारीमध्ये राहतो आहे. दरम्यान, आरोपी मुकेशची वसईतील एका मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये फोनद्धारे संवाद होत असे. आरोपीने त्यानंतर अनेक वेळा पीडितेला भेटण्यासाठी बोलावले. यावेळी त्याने पीडिसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर पीडित मुलगी मुकेशपासून गर्भवती झाली आहे. ही घटना पीडितेच्या कुटुंबीयांना समजली असता, पीडितेच्या कुटुंबियांनी वसई पोलिस ठाण्यात मुकेशविरोधात बलात्काराच्या गुन्ह्याची तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुकेशला अटक केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button