breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक, महापालिकेचे क्कारंटाईन सेंटर ‘सील’, नागरिकांना सोडले आपआपल्या घरी

संबंधित सेंटर प्रमुख कोरोनाबाधित, नागरिकांकडे आयुक्तासह अतिरिक्त आयुक्तांचे दुर्लक्ष

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या दुर्लक्षामुळे मोशीतील आदिवाशी मुलींच्या वसतिगृहाचे क्कारंटाईन सेंटर बंद करण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित क्कारंटाईन सेंटर प्रमुख कोरोना बाधित आल्यानंतर तीन दिवसात हे सेंटर सील करुन तेथील सर्वसामान्य नागरिकांना स्वताःच्या जबाबदारीवर आपआपल्या घरी सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांना तीन दिवसापुर्वी करोनाची लागण झाली. त्याच्याकडे मोशीतील क्वारंटाईन सेंटरची जबाबदारी दिली होती. मात्र, संबंधित अधिका-याला कोरोना होताच ते सेंटर सील करण्यात आले आहे. त्या सेंटरमध्ये राहणा-या संशयित रुग्णांच्या जिवाची कोणतीही पर्वा न करता त्या लोकांना स्वताःच्या जबाबदारीवर आपआपल्या घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेच्या मोशी येथील आदिवासी मुलींच्या वस्तीगृहामध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरमध्ये साधारणपणे 70 ते 100 च्या आसपास नागरिक होते. महापालिका जबाबदारी टाळत असून अधिकारी-कर्मचा-या अभावी तेथील विलगीकरण केलेल्या सर्व नागरिकांना थेट घरी सोडण्यात आले आहे. मुळात क्कारंटाईन केलेल्या नागरिकांच्या जबाबदारी कोणीही घेतलेली दिसत नाही. महापालिकेने उभारलेले हे सेंटर अचानक बंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना नागरिकांच्या जीवाचे मोल नाही. त्या सेंटरमधील नागरिकांना घरी सोडल्याने त्याच्या जीवाचे काही कमी जास्त झाल्यास कोण जबाबदार राहणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांचे करोनाबाबत नियोजन फोल ठरु लागल्याचे दिसत आहे. बोदडे कोरोना बाधित झाल्यानंतर त्याची जागी अन्य पर्यायी अधिकार्‍याकडे या क्वारंटाईन सेंटरचे नियोजन सोपविण्याऐवजी ते थेट सील करुन बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. त्यामुळे कोरोना बाधित अथवा संशयित नागरिकांबाबत महापालिकेचे अधिकारी किती जबाबदारीने वागतात, हे यावरुन स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button