धक्कादायक : पाकिस्तान संघातील आणखी ७ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण
लाहोर : पाकिस्तानच्या आणखी ७ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या वृत्ताला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे. यापूर्वी तीन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती.
फकर झमीन, इमरान खान, कशिफ भट्टी, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हुसेन, मोहम्मद रिझवान आणि वाहाब रियाझ यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
यापूर्वी पाकिस्तान संघातील हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इंग्लंड दौर्यापूर्वी रविवारी रावळपिंडी येथे पाकिस्तान संघातील खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. तोपर्यंत या खेळाडूंमध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे आढळून आली नव्हती.
दरम्यान, आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या हैदर अली, हरीस राऊफ आणि शादाब खान या तिन्ही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल टीमच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले असून त्यांना लगेच आयसोलशेन करण्यात आले आहे. याशिवाय, इमाद वसीम आणि उस्मान शिंवरी या खेळाडूंनी रावळपिंडी येथे कोरोनाची टेस्ट केली. मात्र, त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ते 24 जून लाहोरला जातील, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.