breaking-newsमहाराष्ट्र

धक्कादायक! तरुणाचा गळा चिरून खून

महाईन्यूज | कळस

सणसर, तालुका इंदापुर जवळील ३९ फाटा येथे रमजान लालसाहेब शेख वय (३०) या तरूणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खुन केल्याची घटना घडली . पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ फाटा येथील वर्कशॉप मध्ये बुधवारी रात्री रमजान शेख झोपले होते. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून गुरूवारी पहाटे खुन करण्यात आला आहे. घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आले आहे .फुटेजमध्ये याबाबत काही धागेदोरे लागण्याची शक्यता आहे .

सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी जावुन तपासास सुरूवात केली आहे . शेख हा जाचकवस्ती येथील रहिवासी असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता .शेख यांचा मृतदेह लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button