breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

धक्कादायक : गुजरातमध्ये ट्रेनी क्लार्क महिलांची कपडे उतरवून केली ‘मेडिकल टेस्ट’

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टिम 

गुजरातच्या सुरत येथे नगरपालिकेच्या ट्रेनी क्लार्क महिलांना फिटनेस टेस्टच्या नावाखाली एका रुग्णालयात त्यांचे कपडे उतरवून तपासणी करण्यात आलीय. यामध्ये त्यांच्या प्रायव्हसीची काळजी देखील घेतली गेली नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलांना अत्यंत आक्षेपार्ह प्रश्नही विचारण्यात आले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे गुजरात येथील या महापालिकेचे नाव देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.

हे प्रकरण गुजरात सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या सुरत नगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील आहे. जिथं महिला ट्रेनी क्लर्क्सना विवस्त्र करत महिलांशी संबंधित आजारांची तपासणी केली गेली, असा आरोपी महिला कर्मचा-यांनी केला आहे.

महिलांना चक्क विवस्त्र होण्यास सांगितलं

महिला ट्रेनी क्लार्कनी असा आरोप केला आहे की, त्यांना नोकरीसाठी आवश्यक फिटनेस टेस्ट करण्यासाठी रुग्णालयात बोलावण्यात आलं. सर्व महिलांना १०-१० च्या ग्रुपमध्ये उभं राहण्यात सांगितलं. ज्या खोलीत ही तपासणी सुरू होती त्या खोलीचा दरवाजा सुद्धा बंद केलेला नव्हता. तिथं फक्त एक पडदा होता. त्यामुळे महिलांना अतिशय लाजिरवाणं वाटत होतं. दरम्यान, तपासणी करतांना लग्न न झालेल्या तरुणींना त्या कधी गरोदर होत्या का ? असा प्रश्न विचारण्यात आला. डॉक्टरांनी त्यांची फिंगर टेस्ट घेतली. त्यांच्यासोबत खूप वाईट आणि अपमानास्पद वागणूक केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे या तरुणींना मानसिक धक्का बसला आहे.

या प्रकरणात रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितलं आहे की, रुग्णालयाच्या नियमानुसारच ही तपासणी करण्यात आली. महिलांची शारीरिक तपासणी करणे गरजेची होती. या तपासणीत महिलेला कुठला आजार तर नाही, याची माहिती घेण्यात आली.

यापूर्वी भुजमध्ये घडला असा प्रकार

भुजमध्ये श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थिनींची पाळी आली की नाही हे तपासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर असतानाच आता या घटनेने गुजरात सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. यावेळी विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर आरोप केला की, त्यांना मासिक पाळी असणाऱ्या विद्यार्थिनींपासून दूर राहण्यासाठी आणि विटाळ पाळण्यास सांगितलं गेलं आहे. यासाठी माहिती करून घेण्यासाठी मुख्याध्यापक आणि कॉलेजच्या इतर स्टॉफनं मिळून जवळपास १२ विद्यार्थिनींसोबत अपमानास्पद वागणूक केली. त्यांनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं पळवलं आणि त्यांचे अंतर्वस्त्र काढून पाळी आली की नाही, हे दाखविण्यास सांगितलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button