breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अतिनील किरणांचे वाढते आक्रमण

पुणे -सुर्यप्रकशतील अतिनील किरणांमुळे मानसांवर,जनावरांवर आणि वनस्पती सृष्टीवर अनिष्ट परिणाम होत आहेत. या अतिनील किरनांमुळे डोळ्यांना हनी पोहचत आहे.मोतीबिंदू यासारख्या समस्या निर्माण होत आहेत.

अतिनील किरनांपासून रक्षन करणाऱ्या ओझन थराला छिद्र पडल्याने अतिनील किरनांची तीव्रता वाढत चाललेली आहे. या अतिनील किरणांचा धोका पृथ्वीवर वाढत आहे. जेव्हा या किरणांचा पृथ्वीच्या पृष्ठाशी संबंध येतो तेव्हा ही किरणे ओळखता येतात. ओझंन 1 टक्का कमी झाला तर अतिनील किरणांमध्ये 3 टक्‍याने वाढ होते.

पृथ्वीला लागून असलेल्या थरात ओझोन कमी आहे. मात्र पृथ्वीच्या वरच्या बाजूस हा थर अधिक आहे. त्यामुळे हिमाच्छादित प्रदेशात या किरनांचे 90 टक्के शोषण होते.धूळ ,धूर यामुळेही अतिनील किरणांचे शोषण होत.त्याचबरोबर ढगांमुळे ही अतिनील किरणे शोषली जातात.विरळ ढग असतील तर तिथे किरनांचे प्रमाण जास्त असते तर ढग घनदाट असतील तिथे किरनांचे प्रमाण कमी असते.

स्थल, कालपरत्वे या किरणांची तिव्रता बदलत जाणारी असते. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव मध्ये किरणांचा परिणाम कमी जाणवतो.
अतिनील किरणांना वातावरणाच्या वरच्या थरातील ओझोन वायु रोखतो पण वाढ्‌त्या प्रदुषनामुळे ओझोन वायुच्या स्तराला क्षती पोहचत असल्याने या अतिनील किरणांचा धोका वाढत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button