breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात ५३ हजार नव्या रुग्णांची वाढ, एकूण बाधितांचा आकडा ७८ लाखांवर

नवी दिल्ली – कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसतेय. गेल्या २४ तासांत ५३ हजार ३७० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, तर, ६५० मृतांचीही नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे.

देशातील एकूण ७८ लाख १४ हजार ६८२ कोरोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ८० हजार ६८० अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख १६ हजार ४६ जणांचा समावेश आहे.

२३ ऑक्टोबरपर्यंत देशात १० कोटी १३ लाख ८२ हजार ५६४ नमून्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमुने काल तपासण्यात आले. आयसीएमआरकडून ही माहिती मिळाली आहे.

देशातील कोरोनाची स्थिती निश्चित कशी आहे हे ठरविण्याच्या दृष्टिकोनातून पुढील तीन महिने निर्णायक ठरणार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले. आगामी उत्सवांचा काळ आणि हिवाळ्यात जनतेने कोविड-१९ बाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button