breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २४ तासांत ९३ हजार ३३७ नवे रुग्ण

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशात नियमित ९० हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासांत ९३ हजार ३३७ नवे रुग्ण सापडले आहेत, तर मृतांचा आकडा १२७४ आहे. नियमित वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. देशात सध्या अनलॉकींगचती प्रक्रिया सुरू असल्याने रुग्ण वाढत असल्याचं सांगण्यात येतंय. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.

नव्या रुग्णसंख्येमुळे देशात आता ५३ लाख ८ हजार १५ कोरोनाचे रुग्ण आहेत. यामध्ये १० लाख १३ हजार ९६४ रुग्णांवर उपचार सुरू असून ४२ लाख ८ हजार ४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, एकूण मृतांचा आकडा ८५ हजार ६१९ वर पोहोचला आहे.

काल दिवसभरात ८ लाख ८१ हजार ९११ देशभरात चाचण्या करण्यात आल्या असून कालपर्यंत एकूण 6 कोटी 24 लाख 54 हजार 254 एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button