breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

पेटीएम अॅप पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

नवी दिल्ली – गुगलच्या प्ले स्टोअरच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पेटीएम गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं होतं. यामुळे पेटीएमच्या अनेक ग्राहकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, प्ले स्टोअरवर हे अॅप आता पुन्हा एकदा उपलब्ध झालं आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल असं पेटीएमने म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम अ‍ॅप गुगलने त्यांच्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकलं होतं. पेटीएमच्या माध्यमातून खेळासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी संमती देत नाही असं गुगलने स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता हे App पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button