breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात स्वच्छ सर्वेक्षणात इंदूरला अव्वल स्थान, तर नवी मुंबईचा तिसरा झेंडा, यावेळेस मात्र पुणे मागे

स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ च्या निकालात मध्य प्रदेशातील इंदूरला सलग चौथ्या वर्षी स्वच्छतेत अव्वल स्थान प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील नवी मुंबईने देशात स्वच्छतेत तिसरे स्थान पटकावलं आहे. या मध्ये ‘स्वच्छ पुणे ,सुंदर पुणे’ पुणयाचं हे ब्रीद वाक्य मात्र कुठेतरी मागे पडताना दिसलं.या वेळेस मुंबईने पुण्याला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. पुणे शहराला अव्वल १० मध्ये स्थान मिळवाता आलेले नाही.

राज्यातील नाशिकने ११ वे ठाण्याने १४ वे आणि नागपूरने देशात १८ वे स्थान पटकावले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छतेबाबतच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ च्या निकालांची आज घोषणा केली आहे. त्यानुसार मध्य प्रदेशातील इंदूरला सलग चौथ्या वर्षी स्वच्छतेत अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराला पुन्हा अव्वल १० मध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले आहे. पुण्याला २०२० च्या सर्वेक्षणात १५ वे स्थान प्राप्त झाले असून पहिल्या १० शहरांत राज्यातून केवळ नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबईला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. तर नाशिक आणि ठाणे अनुक्रमे ११ व्या आणि १४ व्या स्थानावर, तर नागपूर १८ व्या क्रमांकावर आले आहे

या वेळी स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना पुरस्कार दिले जाणार आहेत. या बरोबरच पंतप्रधान मोदी देशातील काही ‘स्वच्छाग्रही’ आणि सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे.देशाच्या नागरिकांमध्चे स्वच्छतेबाबत भागीदारी वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या २८ दिवसांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२० पूर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी आयोजित होणाऱ्या स्वच्छ महोत्सवात स्वच्छता सर्वेक्षण अहवालाव्यतिरिक्त स्वच्छ सर्वेक्षण इनोव्हेशन, स्वच्छ सर्वेक्षण सोशल मीडिया आणि गंगेच्या किनावरील शहरांवरील अहवाल देखील प्रसिद्ध केले जाणार आहेत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्याच वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताव मैसूर या शहराने पटकावला होता . त्यानंतर सतत चार वर्षे, म्हणजेच सन २०१७, २०१८ आणि २०१९ आणि आता सन २०२० मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button