breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात गेल्या 24 तासात 75,829 जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाखांच्या पार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 65 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 55 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 75 हजार 829 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 940 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 65 लाख 49 हजार 374 एवढा झाला आहे. त्यापैकी उपचारादरम्यान 1 लाख 1 हजार 782 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत सुमारे 55 लाख 9 हजार 967 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाने जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशात हाहाकार माजवला आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 कोटी 45 लाखांच्या पार गेला असून, जगभरात सुमारे 10 लाख 26 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 2 कोटी 39 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button