breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात एका दिवसात 11 हजारांहून अधिक कोरोना बाधित

नवी दिल्ली | भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पार पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 11458 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 386 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सलग 9व्या दिवशी 9,500 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3 लाख 08 हजार 993 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 8884 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एक लाख 54 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने शुक्रवारी भारताने ब्रिटनला मागे सोडलं. त्यामुळे भारत जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझील, रूसनंतर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा अधिक रुग्ण अमेरिका अमेरिका (2,116,672), ब्राजील (829,902), रूस (511,423)मध्ये आहेत. तर भारत रुग्ण वाढीचा वेगात जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर एक दिवसात सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button