breaking-newsताज्या घडामोडीपुणे

देशातील जनताच मोदी सरकारला घरी बसवेल – माजी आमदार मोहन जोशी

देशातील जनताच मोदी सरकारला घरी बसवेल – माजी आमदार मोहन जोशी

– शेतकरी आंदोलनास पाठिंब्यासाठी विश्रांतवाडी येथे शहर कॉग्रेस कमिटी वडगावशेरी मतदार संघाच्या वतीने धरणे आंदोलन

पुणे | प्रतिनिधी

केंद्रातील मोदी सरकार कृषी कायद्याबाबत आडमुठी भुमिका घेत आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु आडमुठे सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. आंदोलना दरम्यान अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील जनता नक्कीच मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विश्रांतवाडी येथे शहर कॉग्रेस कमिटी वडगावशेरी मतदारसंघाच्यावतीने धरणे आदोंलन घेण्यात आले. त्यावेळी जोशी बोलत होते.

काँग्रेस कमिटी वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष विकास टिंगरे व येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट आदींनी याचे आयोजन केले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, संतोष आरडे, कैलाश गायकवाड, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगिता तिवारी, अनुसूचित जाती सेल उपाध्यक्ष भुजंग लव्हे, डॉ.रमाकांत साठे, युवकचे उपाध्यक्ष राहुल शिरसाट, महिला शहराध्यक्षा सोनाली मारणे, सरचिटणीस विल्सन चंदेवळ, बाबा नायडू, शिवानी माने, अल्तमश मोमीन, राजू ठोंबरे तसेच काँग्रेसचे वडगावशेरी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी भाषणे केली.

जोशी म्हणाले की, देशातील सर्वसामान्यांना मिळणारे अन्नधान्य देखील बंद करण्याचा घाट मोदी सरकार घाट घालत आहे. यामुळे देशात सामान्य लोकामध्ये सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलन ही सामान्य नागरिकांच्या हिताचे आहे. यामुळे देशात कॉॅग्रेस शेतकार्‍यांना पाठिंबा देत आहे.जर सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकार्‍यांच्या विरोधात केलेले कायदे मागे घेतले नाहीत, तर राज्यसह देशात आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button