breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुष्काळात तेरावा: पुण्यासह राज्यातील अनेक भागात पाऊस

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी आल्या. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वातावरणात काहीसा गारवा जाणवतो आहे. पुण्यात सिंहगड, कोथरूड आणि हडपसर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाल्याने पुण्यातील उष्णतेचा पारा कमी झाला आहे. एकूणच पुणे शहरात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने पुण्यात सिंहगड परिसरात वीजेचा पुरवठाही खंडीत झाला. कात्रज कोंढवा-मुंडवा परिसरातही जोरदार पाऊस आला. त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याचंही पाहायला मिळालं.

पुण्यातील मावळ आणि पिंपरी चिंचवड भागातही पावसाने हजेरी लावली. आधीच कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट झाला असताना आणखी अवकाळी पावसाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडसह लगतच्या मावळ तालुक्यात अचानक आलेल्या या पावसाने वातावरणात बराच गारवा निर्माण केला. कोरोना व्हायरसला हे थंड वातावरण अनुकूल ठरु शकते, असं अनेक जाणकार सांगत आहेत. त्यामुळं थोडा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यातच पिकांचे होणारे नुकसानाने शेतकऱ्यांना दुहेरी झटका बसतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button