breaking-newsक्रिडा

दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले

जकार्ता – आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजाने भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपक कुमारने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. त्याने 247.7 गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला. सुवर्णपदकाच्या शर्यतीत त्याने चीनच्या यांग हाओरानला कडवी झुंज दिली. चीनी खेळाडूने 249.1 गुणांच्या आशियाई स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. चायनीज तैपेईच्या लू शाओचूनने ( 226.8) कांस्यपदक जिंकले. भारताच्या रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

View image on Twitter

View image on Twitter

Team India@ioaindia

🥉 medal winner from Day 1 at the #AsianGames, #RaviKumar qualifies for the 10m Air Rifle Men’s Finals after finishing with a total of 626.7. #DeepakKumar with 626.3 also qualifies right behind Ravi. Both Deepak and Ravi will be vying for the yellow metal! #AllTheBest #TeamIndia

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अपूर्वी चंडेलासह मिश्र गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या रवी कुमारकडून 10 मीटर एअर रायफल पुरूष एकेरी गटात पदकाच्या अपेक्षा होत्या. पात्रता फेरीत त्याने 626.7 गुणांसह चौथे स्थान पटकावले. तर दीपकला 626.3 गुणांसह पाचवे स्थान मिळाले. पात्रता फेरीतील लढतीतील अपयश मागे टाकून दीपकने अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. त्याने चीन व तैपेईच्या खेळाडूंसमोर कडवे आव्हान उभे करताना सुवर्णपदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button