breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिवाळी बोनस ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
महा ई न्यूज |नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं आज दिवाळी भेट दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. नव्या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळं सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.